
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या पक्षाच्या नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात घेण्यासाठी सर्वच पक्षांची चढाओढ सुरू आहे. या चढाओढीत भाजप अग्रस्थानी असल्याचे दिसून येते. दिल्लीत भाजपला तसे यशही मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने दिल्लीत आम आदमी पक्षाचे पाच नगरसेवक फोडत त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले.
आपने भाजपवर हल्लाबोल केला आहे. ऑपरेशन लोटस चालवून भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. आपचे खासदार आमचे निवडणूक चिन्ह झाडू आहे आणि ज्यांच्या डोक्यात या सत्तेची नशा आहे. त्यांच्या डोक्याला झाडून इथली जनता दुरुस्त करेल. आम्हीही ठीक करू, असेही सिंह पुढे म्हणाले.
सरकार पाडण्यासाठी इतर राज्यांत भाजपने जे फॉर्म्युले वापरले, ते इथे यशस्वी होणार नाही. त्यांना त्यांचे नापाक प्रयत्न करू द्या. अशी चूक भाजपने करू नये, असेही संजय सिंह यांनी नमूद केले.