गुजरातमध्ये ‘आप’ कार्यकर्त्यांची धरपकड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये भाजप सरकारच्या कारभाराविरोधात रान उठवणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. एका कार्यकर्त्याच्या अटकेचा जाब विचारण्यासाठी गेलेले ‘आप’चे गुजरात प्रदेशाध्यक्ष इसूदान गढवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यामुळे वातावरण तापले आहे. जामनगर येथे घेतलेल्या सभेत आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ‘आप’ कार्यकर्त्यांच्या अटकेचा त्यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांची याबाबत भेट मागितली आहे.