
आरे कॉलनी प्रभाग क्र. 53 मधील रॉयल पाम्स इस्टेटमधील रहिवाशांनी ब्रेकफास्ट युनिटी मिट आयोजित केले होते. राजकीय मतभेद ओलांडून दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि रहिवाशी यांच्यातील खुल्या संवादाला चालना देणे यामागचे उद्दिष्ट होते.
ब्रेकफास्ट युनिटी मिट अंतर्गत रहिवाशांनी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक जितेंद्र वळवी यांचा सत्कार केला. आरे कॉलनी आणि प्रभाग क्र. 53 मधील प्रत्येक रहिवाशांच्या समस्या सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. विभागातील समस्या वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सोडवण्याचे आश्वासन जितेंद्र वळवी यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमात रॉयल पाम्स इस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष हितेश काचरू राजेश शेट्टी, मोरक्कन सोसायटीचे अध्यक्ष सत्याम गंजी, दादा राव, डॉ. हांडिके यांच्यासह अनेक हाउसिंग सोसायटयांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. निवृत्त पोलिस महानिरीक्षक मोहन राठोड यांनी आदिवासी तरुणांसाठी सल्लामसलत आणि मेंटरशिप कार्यक्रम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
Aarey Colony Residents Organize ‘Breakfast Unity Meet’ to Solve Civic Issues | Royal Palms Estate
Residents of Royal Palms Estate in Aarey Colony held a ‘Breakfast Unity Meet’ with Shiv Sena Corporator Jitendra Valvi. The meet focused on resolving long-pending civic issues and mentoring tribal youth. Read more about this community initiative.




























































