बीपीओतील तरुणीवर अत्याचार व हत्या प्रकरण, नराधमांची फाशी जन्मठेपेत बदलली

2007 मध्ये पुण्यात बीपीओतील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दोघा नराधमांच्या फाशीच्या शिक्षेचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेत रूपांतर केले. मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. त्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आणि महाराष्ट्र सरकारचे अपील फेटाळले.

पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकाटे या दोघा नराधमांना 24 जून 2019 रोजी फाशी दिली जाणार होती. त्याच्या तीन दिवस आधी मुंबई उच्च न्यायालयाने फाशीला स्थगिती दिली होती आणि 35 वर्षांसाठी जन्मठेप सुनावली होती. त्या निकालाला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सरकारचे अपील न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने सोमवारी फेटाळले.