
दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने अभिनयानंतर आता राजकारणात पदार्पण करत असल्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारीमध्ये त्याने तमिळगा वेत्री कळघम पक्षाची घोषमा केली होती. अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचा अध्यक्ष थलापती विजय याने आणखी एक पाऊल पुढे करत चैन्नई येथील पक्षाच्या कार्यालयात त्याने पक्षाच्या झेंड्याचे आणि चिन्हाचे अनावरण केले.
”मला माहित आहे तुम्ही सर्व आपल्या पहिल्या राज्य संमेलनाची वाट पाहत आहात. यासाठी तयारी सुरू आहे आणि लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल. त्याआधी मी पक्षाच्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. मला फार अभिमान वाटतोय. आम्ही तामिळनाडूच्या विकासासाठी मिळून काम करू, असा विश्वास यावेळी त्याने व्यक्त केला.
View this post on Instagram
तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाकडून सप्टेंबरच्या शेवटी विलिलुपुरम जिल्ह्यातील विक्रवंडीमध्ये एक रॅलीचे आयोजन केले आहे. ही रॅली टीवीकेच्या औपचारीक शुभारंभाचे प्रतिक असेल.
विजय याने फेब्रुवारीमध्ये तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाची घोषणा केली. विजय याची ‘थलपति 69’ या आपल्या शेवटच्या सिनेमानंतर पूर्णपणे राजकारणात उतरण्याची योजना आहे. फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण केले जाईल. त्याने पुढील दोन वर्षांत TVK च्या माध्यमातून तळागाळात पायाभूत सुविधा तयार करण्याचे वचन दिले आहे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देण्याचे स्पष्ट केले आहे.