Hindenburg on Adani News – हिंडनबर्गच्या आरोपांवर अदानी समुहाचे स्पष्टीकरण, म्हणाले तथ्य आणि…

अमेरिकन फर्म हिंडनबर्गने आपल्या ताज्या अहवालात सेबीवर आरोप केले आहेत. सेबीच्या प्रुख माधवी बुच यांचेच अदानी कंपनीत हिस्सेदारी असल्याचे हिंडेनबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे. आता अदानी कंपनीने यावर आपले स्पष्टीकरण जाहीर केले आहे. अदानी समुहाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अदानी समुहाने हिंडनबर्गच्या अहवालावर विस्तृत स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले आहे की अदानी समुहावर झालेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. आरोपांमध्ये माहिती तोडून मोडून सादर करण्यात आली आहे. या आधीही आमच्यावर जे आरोप झाले होते, त्यावर खोलवर तपास झाला होता पण ते सर्व आरोप निराधार असल्याचे निष्पण्ण झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2024 मध्येच यावर निकाल दिला आहे.

अदानी समुहाने म्हटले आहे की आमची ओव्हरसीज होल्डिंग स्ट्रक्चर पारदर्शी आहे. ज्या कंपनीशी संबंधित माहिती सार्वजनिक प्रकाशनातून प्रकाशित केली जाते. अदानी समुहाला हा बदनाम करण्याचा कट असून हिंडनबर्गने सांगितलेल्या व्यक्तींचा आणि अदानी समुहाचा कुठलाही व्यावसायिक संबंध नाही असे अदानी समुहाने म्हटले आहे.