1 मेपासून आदी कैलास यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील आदी कैलास यात्रा येत्या 1 मे 2026 पासून सुरू करण्याची तयारी केली जात आहे. हवामान अनुकूल राहिल्यास प्रशासन एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात इनर लाइन परमिट जारी करू शकते. मागील वर्षी आदी कैलास यात्रेला 30 हजारांहून अधिक भाविक पोहोचले होते. यंदाही हजारोंच्या संख्येने भाविक पोहोचतील, अशी शक्यता आहे.