
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दादर पूर्व येथील हनुमानाचं दर्शन घेऊन महाआरती केली. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते स्थानिक खासदार अनिल देसाई, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, विभागसंघटक माजी महापौर श्रद्धा जाधव तसेच इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी होते.