भेसळयुक्त दुधाने 16 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशातील भेसळयुक्त दूध प्यायल्याने आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. लालाचेरुवू, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर यांसारख्या भागात फेब्रुवारी महिन्यापासूनच लोक आजारी पडू लागले होते. दूध प्यायल्यानंतर लोकांना उलटय़ा, पोटदुखी आणि किडनी फेल होणे यांसारख्या गंभीर समस्या जाणवू लागल्या. तपासणीतून समजले की स्थानिक डेअरी युनिटमधून पुरवठा केलेल्या दुधात ‘इथिलिन ग्लायकॉल’ हा विषारी पदार्थ मिसळलेला होता.