स्वस्तातला आयफोन 17 ई लवकरच येतोय

आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, परंतु आयफोनच्या किमती लाखांच्या पुढे असल्याने अनेक जण आयफोन खरेदी करत नाहीत. परंतु आता अ‍ॅपल आपला स्वस्त किमतीतील आयफोन 17 ई हा लवकरच लाँच करण्याची तयारी करत आहे. हा फोन आयफोन 16 ईचे अपग्रेड व्हर्जन असणार आहे. कंपनीकडून या फोनच्या लाँचिंगसंबंधी अधिकृत माहिती अद्याप शेअर करण्यात आली नाही. परंतु या फोनचे मास प्रोडक्शन सुरू झाले आहे. या फोनला पुढच्या महिन्यात किंवा मार्चच्या अखेरपर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात या फोनची किंमत 60 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.