
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने देशातील बल्ख प्रांतात वाय-फाय इंटरनेटवर बंदी घातली आहे. अनैतिकतेच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. 2021 मध्ये सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानने तेथे अनेक निर्बंध लादले आहेत. आता त्यांनी वाय-फाय इंटरनेटकडे मोर्चा वळवला आहे. बल्ख प्रांतातील सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये, सार्वजनिक संस्था आणि घरांतील वाय-फाय इंटरनेट हटवण्यात आले आहे. मोबाइल इंटरनेटला बंदीतून वगळण्यात आले आहे. हळूहळू संपूर्ण देशात वाय-फाय इंटरनेटवर बंदीची शक्यता आहे.