डुकरांमध्ये आढळला ‘आफ्रिकन स्वाइन फिवर’, राहात्यातील साकुरीत खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिवर आढळल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरीत दाखल झाले असून, डुकरांची शास्त्र्ााrय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.

साकुरीत काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडत आहेत. अहिल्यानगरच्या पशुवैद्यकीय पथकाने साकुरीसह जिह्यातील इतर काही गावांमधील डुकरांचे नमुने भोपाळ येथील लॅबला तपासणीसाठी पाठविले होते. साकुरीतील डुकरांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले असून, त्यांना ‘आफ्रिकन स्वाइन फिवर’ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

अहवाल प्राप्त होताच जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने डुकरांची शास्त्र्ााrय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याचा मानवी आरोग्यास यापासून धोका नाही, असे पशू शल्यचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त मुकुंद राजळे यांनी केले आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. निर्जंतुकीकरणासाठी  गावात औषध फवारणी करण्यात येणार आहे, असे सरपंच मेघना दंडवते यांनी सांगितले.