
बिहारपाठोपाठ आता पश्चिम बंगालमध्येही निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेला सुरूवात केली आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार यादीची विशेष फेर तपासणीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. बिहारमध्ये ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. SIR प्रक्रियेअंतर्गत बिहारमध्ये 1 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रक्रियेनंतर बिहारमध्ये सुमारे 65 लाख मतदारांची नावं मतदार यादीमधून हटवली जातील. यामध्ये बहुतांश असे मतदार आहेत, जे आता हयात नाहीत. उरलेले असे मतदार आहेत, जे कायमस्वरूपी दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाले आहेत. काही असे मतदारही आहेत, ज्यांची नावे एकापेक्षा जास्त मतदारसंघांत नोंदवलेली होती. मात्र, विरोधक निवडणूक आयोगाच्या या मतदार यादीची विशेष फेर तपासणी प्रक्रियेचा विरोध करत असून, ही भाजपच्या इशाऱ्यावर मतांची चोरीअसल्याचा आरोप के ला आहे.