दोन्ही ‘राष्ट्रवादी’ आगामी निवडणुका एकत्र लढणार

काही दिवसांतच राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रच लढविल्या जाणार असल्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर झाला आहे. तसेच या निर्णयाचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

सिद्धटेक परिसरातील एका भेटीनंतर माजी मंत्री राजेश टोपे यांनी येथील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी पक्ष नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांप्रमाणेच आगामी 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींच्या निवडणुकाही एकत्रच लढवणार आहेत. तसेच जेथे दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ उमेदवार असतील, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींची शक्यताही त्यांनी वर्तवली. यावेळी वैशाली नागवडे, माधुरी पाटील, प्रवीण कापसे, हनुमंत भोसले आदी उपस्थित होते.