एआय रायफल शत्रूला क्षणार्धात उडवणार

लष्कराच्या ताफ्यात एआय आधरित अत्यंत प्रगत रायफल सिस्टिम आली आहे. ही रायफल एआयवर आधारित आहे. म्हणजे तिला चालवण्यासाठी जवानाची गरज नाही. ती स्वतःहून चालवली जाणार आणि शत्रूला शोधून शोधून गोळ्या घालणार. लडाखसारख्या बर्फाळ पर्वतांवर जिथे जवान तैनात करणे धोकादायक आहे, तिथे एआय मशीनगन एकदम उपयुक्त ठरेल.

एआय रायफल ‘कटना’ ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. हे पारंपरिक शस्त्र नसून एक स्मार्ट शस्त्र आहे. ते फक्त शत्रूचा शोध घेत नाही, तर विचार करून प्रतिकार करेल. एआय रायफल डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच शत्रूवर हल्ला चढवेल. प्रगत रायफल सिस्टिम असलेल्या ‘कटना’ला पुणीच रोखू शकत नाही. शत्रू कितीही दूर असेल, कुठेही लपला असेल तरी एआय रायफल त्याचा वेध घेईल.