एआय न्यायाधीशांच्या मदतीसाठी हवे, त्यांची जागा घेण्यासाठी नाही, न्या. रवींद्र घुगे यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआय न्यायाधीशांच्या मदतीसाठी हवे, त्यांची जागा घेण्यासाठी नाही. कारण न्यायाधीश देत असलेले निकाल ही काही तांत्रिक बाब नाही, असे मत न्या. रवींद्र घुगे यांनी व्यक्त केले.

एका कार्यक्रमात अत्याधुनिक तंत्राविषयी मार्गदर्शन करताना न्या. घुगे यांनी न्यायपालिकेतील एआयच्या वापरावर भाष्य केले. एआयद्वारे अनेक मुद्दय़ांचा सारांश मिळतो. तपशील अधिक सोपा होतो. मात्र पुराव्यांची सत्यता. अधिकारांचे उल्लंघन व अन्य कायदेशीर बाबींचा विचार करून निकाल देण्याचे काम एआय करू शकत नाही. हे काम केवळ न्यायाधीशच करू शकतात, असे न्या. घुगे यांनी नमूद केले.

न्यायपालिकेत अत्याधुनिक तंत्र आता सहज वापरात येते. ई-फायलिंग, ऑनलाईन सुनावणी, असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. पूर्वी असे नव्हते. युक्तिवादासाठी न्यायालयात यावे लागत होते, याची आठवण न्या. घुगे यांनी करून दिली.