नेतन्याहू सर्वात मोठा गुंड अल्लाह बघून घेईल! ओवेसी यांचा संताप

‘बेंजामिन नेतन्याहू हा जगातील सर्वात मोठा गुंड आहे. त्याने 65 हजार लोकांचा जीव घेतला. 12 लाख लोकांना बेघर केले. अल्लाह त्याला बघून घेईल,’ असा संताप एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आज व्यक्त केला.

इस्रायल व हमासमधील युद्धबंदीच्या मुद्द्यावर ते बोलत होते. ‘गाझातील युद्धबंदीनंतर आपले पंतप्रधान मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्पचे अभिनंदन केले. नेतन्याहू यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. ज्याने 20 हजार चिमुकल्यांसह 65 हजार लोकांचा जीव घेतला. त्याचे कौतुक मोदी करतायत. तुम्ही हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात. तुम्हाला नेतन्याहूचे कौतुक करण्याची काय गरज आहे? आम्ही मोदींच्या या कृतीचा निषेध करतो, असे ओवेसी म्हणाले.