
गुजरातच्या भुज विमानतळावर शनिवारी पुन्हा एकदा एअर इंडियाचा सावळा गोंधळ पहायला मिळाला. भुजहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 180 प्रवाशांचं बुकिंग होतं, मात्र प्रत्यक्षात केवळ 155 प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले. 25 प्रवाशांना प्रवास करता आला नाही. यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. आधीच बुकिंग करूनही प्रवास करता न आल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काय घडलं नेमकं?
180 सीटचे विमान उड्डाण करणार होते. मात्र प्रत्यक्षात आयत्यावेळी 155 सीटचे विमान आले. यामुळे उरलेल्या प्रवाशांना प्रवास करता आला नाही. प्रवासी भुज विमानतळावर अडकून पडले आहेत. एअर इंडियाने आतापर्यंत कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहेच, पण त्यांच्या प्रवासाच्या योजनांवरही परिणाम होत आहे. प्रवाशांना भुज येथील एका खाजगी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.