
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात शेकडो प्रवाशांना नागरिकांना जीव गमवावा लागला. आज हिंदुस्थान आणि हिंदुस्थान ‘अ’ संघातील खेळाडूंनी सराव सामना एक मिनिट मौन पाळत अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच हातावर काळी फीत बांधून सर्व खेळाडू मैदानावर उतरले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बेकेनहॅम येथे झालेल्या इंट्रा-स्क्वॉड सामन्यात सहभागी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने हातावर काळय़ा फिती घालून मैदानात प्रवेश केला. अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळण्यात आले, असे बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.