
दिल्ली विमानतळावर विमान अपघाताची मोठी घटना घडली आहे. विमानतळावर लँडिंग करताच एअर इंडियाच्या हाँगकाँग-दिल्ली विमानातील सहाय्यक पॉवर युनिटला आग लागली. दिल्लीतील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ही दुर्घटना घडली.
हाँगकाँगहून आलेले एअर इंडियाचे विमान AI 315 मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. प्रवासी विमानातून बाहेर पडत असताना ही घटना घडली. विमान गेटवर पार्क केल्यानंतर काही वेळातच सहाय्यक पॉवर युनिटला (एपीयू) आग लागली आणि सिस्टम डिझाइननुसार एप्यू आपोआप बंद झाले.
प्रवासी आणि क्रू मेंबर्सना सुखरुप विमानातून बाहेर काढण्यात आले. पुढील चौकशीसाठी विमान ग्राउंड करण्यात आले आहे. एअरलाइन कंपनीने निवेदन जारी करत घटनेची पुष्टी केली आहे.