टाटा समूहाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटीची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह बांधून देणार

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने एक प्रवासी बचावला आहे. मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारत टाटाने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकि एक कोटीची मदत जाहिर केली आहे. इतकेच नव्हे तर जखमींचा खर्च टाटा उचलणार असून विमानामुळे कोसळलेले   मेडिकल कॉलेजचे वसतीगृहही टाटा बांधून देणार आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताबाबत टाटाकडूनही दुख व्यक्त करण्यात आले असून कुटुंबियांच्या मदतीसाठी टाटा सरसावली आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून या घटनेने अतीव दुख झाल्याचे म्हटले आहे. विमान दुर्घटनेत ज्या कुटुंबियांनी आपले प्रियजन गमावले आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्यासोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा ग्रुपकडून एक कोटी रुपयांची मदत करण्यात येईल तसेच जखमींचा वैद्यकिय खर्च आणि त्यांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन टाटा ग्रुपकडून देण्यात आले आहे.

चार मराठी कुटुंबांवर कोसळला दु:खाचा डोंगर; दोन क्रू मेंबरसह को-पायलट, एअर हॉस्टेसचा मृत्यू