Breaking News – अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं! विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शंका वर्तवली जात आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोळ उठताना दिसत आहेत. विमान कोसळल्याचे कळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Air India Plane Crash – अपघातावर ‘एअर इंडिया’चं ट्विट, 11 वर्ष जुने बोइंग विमान 242 प्रवाशांसह कोसळलं

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघाले होते. यावेळी विमानतळावरून उड्डान घेतल्यानंतर काही वेळातच मेघानीजवळ हा अपघात झाला. अपघातावेळी या विमानामध्ये 242 प्रवासी असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे.

एअर इंडियाचं अहमदाबादहून लंडन जाणारं विमान कोसळलं आहे. एअर इंडियाचं बोइंग ड्रिमलाइन 787 हे विमान अहमदाबादच्या मेघानीनगरमध्ये कोसळलं आहे. अहमदाबादच्या सरकार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ करताना ते आजूबाजूच्या इमारतीला धडकून कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. विमान कोसळताच मोठा आवाज झाला आणि त्यानंतर धुराचे मोठे लोळ उठले. विमानत 242 प्रवासी असल्याचे वृत्त ANI या वृत्त संस्थेने दिले आहे.

Air India Plane Crash- अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असण्याची शक्यता

एअर इंडियाने विमानला अपघात झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. एअर इंडियाने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. Flight AI171 अहमदाबाद-लंडन विमानाला अपघात झाला आहे. यासंदर्भात माहिती मिळवत आहोत, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

Air India Plane Crash – शेअर बाजारावरही परिणाम; टाटा समुहाचे शेअर कोसळले