
थंडी सुरू झाली की हवा प्रदूषणाने दिल्लीकर त्रस्त होतात. मात्र यंदा तर दिल्लीची हवा उन्हाळ्यातच प्रदूषित व्हायला सुरुवात झालेय. त्यामुळे दिल्लीत ग्रेडेड रिस्पोन्स अॅक्शन प्लॅनचा (ग्रॅप) स्टेज 1 लागू करण्यात आला आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडल्यानंतर एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने हा निर्णय घेतला. दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स 201 – 300 दरम्यान आहे. म्हणून खबरदारी घेत उपाययोजना करण्यात येत आहेत.
ग्रॅप- 1 चे निर्बंध दिल्लीसह एनसीआरमध्ये लागू करण्यात आले आहेत. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने लागू केलेल्या ग्रेडेड रिस्पोन्स अॅक्शन प्लॅनचा (ग्रॅप-1) अंतर्गत भोजनालय, रेस्टॉरंटनी रस्ताच्या कडेला जेवणासाठी कोळसा जाळणे, मोकळ्या जागेत कचरा जाळणे अशा गोष्टींना बंदी आहे. दिल्लीकर केवळ वायूप्रदूषणानेच नव्हे तर जलप्रदूषणानेही हैराण आहेत. यमुना नदीत मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळले आहेत.