दुबईत चोरी झालेले एअरपॉड्स पाकिस्तानात सापडले

ब्रिटिश यूट्यूबर ओली पॅटरसन याचे अ‍ॅपलचे एअरपॉड्स चोरीला गेले होते. त्याने फाईंड माय आयफोन फीचरद्वारे त्याचा शोध घेतला. त्यानंतर असे आढळून आले की, त्याचे एअरपॉड्स पाकिस्तानात सध्या वापरले जात आहेत. ओली पॅटरसनने ‘एक्स’वर याबाबत पोस्ट लिहून माहिती दिली. पॅटरसनने लिहिलंय, एक वर्ष माझे एअरपॉड्स पाकिस्तानात आहेत. मी आता ते मिळवणारच.

पॅटरसनने असेही सांगितले की, त्याने ‘लॉस्ट मोड’ सुरू ठेवला आहे. जर कुणी चोराने एअरपॉड्स वापरले तर अ‍ॅपमधून एक आवाज येईल आणि चोर त्रस्त होईल. पाकिस्तानी पोलिसांच्या मदतीने एअरपॉड्स परत आणण्याचा त्याचा विचार आहे. ट्रकिंग यंत्रणेमुळे एअरपॉड्सची ऍक्टिविटी आणि त्याच्या लोकेशनची माहिती मिळत आहे. ओली पॅटरसनच्या पोस्टवर नेटिजन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चोरीला गेलेली वस्तू कशी शोधता येईल व अगदी दुसऱ्या देशात वस्तू असेल तरी शोधता येते.