
केरळमच्या तिरुवनंतपूरममध्ये एक अनोखी परंपरा पाहायला मिळाली. धार्मिक मिरवणुकीमुळे येथील विमानतळ जवळपास 5 तास बंद ठेवण्यात आले होते. पद्मनाभस्वामी मंदिराच्या पैनकुनी अरट्टू उत्सवामुळे हे करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी 4.45 ते रात्री 9 वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण रोखण्यात आले होते. यावेळी मंदिराची मिरवणूक विमानतळाच्या रनवेहून शंखुमुगमपर्यंत गेली. या परंपरेचे पालन अनेक वर्षांपासून केले जात आहे. या मिरवणुकीत शाही कुटुंबातील सदस्य, हत्ती, पोलीस आणि हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.



























































