
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात धास्ती पसरली आहे. आता या टॅरिफमुळेच हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेला हवे त्याप्रमाणे व्यापार करारवर सहमती होण्यासाठी अमेरिका आता हिंदुस्थानवर दबाव टाकत आहे. तसेच रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेने पेनल्टी लादली आहे. त्याला हिंदुस्थानने प्रत्युत्तर दिल्याने चवताळलेल्या ट्रम्प यांनी हिंदुस्थानी औषधांवर 250 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल मॉस्को दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अजित डोवाल मॉस्को दौरा आधीच नियोजित होता. मात्र, रशियाकडून तेल आयातीवरून अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व आले आहे. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी असलेल्या हिंदुस्थानच्या संबंधांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेशी संबंध ताणलेले असताना रशियाशी मैत्री दृछ करत अमेरिकेला काटशह देण्याचा हिंदुस्थानचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.
रशियाच्या तेल आयातीवरून अमेरिका आणि हिंदुस्थान यांच्यातील संबंध ताणले गेले असताना रशियासोबत संबंध मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल मॉस्कोला भेट देण्यासाठी पोहोचले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील महिन्याच्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. ही भेट आधीच नियोजित होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी भारताच्या संबंधांबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे आता ती पुन्हा एकदा निकडीची झाली आहे.
ट्रम्प यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, हिंदुस्थान एक चांगला व्यापारी भागीदार राहिलेला नाही, कारण ते आमच्यासोबत बरेच व्यवसाय करतात. परंतु आम्ही त्यांच्यासोबत व्यवसाय करत नाही. म्हणून आम्ही 25% वर तोडगा काढला, परंतु मला वाटते की मी पुढील 24 तासांत त्यात लक्षणीय वाढ करणार आहेत.