कोणालाही विलासरावांची ओळख पुसता येणार नाही! अजितदादांचा भाजपला टोला

कुणीतरी लातूरला आले आणि विलासराव देशमुखांची ओळख पुसून टाकू, असे म्हणाले. कुणी म्हटल्याने विलासरावांची ओळख पुसली जाईल का? ती पुणालाही पुसता येणार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला लगावला.

लातूर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून नाव न घेता चांगलीच टीकेची झोड उठवली. मागे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अधिक संख्येने निवडून आले होते. परंतु शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिले आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख यांचे योगदान विसरता येणार नाही. पुणीतरी ओळख पुसू म्हणाले म्हणून विलासरावांची ओळख पुसली जाणार का? असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही, असेही ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी राजकारणात सुसंस्पृतपणा असावा, सभ्यता असावी अशी शिकवण दिली आहे. इतरांशी आदराने बोलायला काय पैसे लागतात का, असा सवालही त्यांनी केला.