Ajit Pawar Plane Crash – दोषींना कोणीही वाचवू शकणार नाही! विधिमंडळ, संसदेतील मुस्कटदाबीवरून रोहित पवारांचा कडाडून हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांचा विमान अपघात की घातपात असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना असून ते सातत्याने या विषयावर आवाजही उठवत आहेत. याच निमित्ताने त्यांनी दिल्लीत प्रमुख राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र संसदेत यावर चर्चाच होऊ दिली जात नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. तसेच कितीही अडथळे आणले तरी दोषींना कोणीही वाचवू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

रोहित पवार यांनी बुधवारी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. संसदेच्या अधिवेशनात अजित दादांच्या अपघाताच्या पारदर्शक चौकशीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने आम्ही इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना भेटून पाठपुरावा करत आहोत. काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष हे पारदर्शक चौकशीची मागणी करणार आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Ajit Pawar Plane Crash – रोहित पवारांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली, नेमकी काय झाली चर्चा?

मराठी स्वाभिमान जपणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बोलू दिले गेले नाही. हे पाहता, ज्याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळात चर्चा होऊ दिली जात नाही त्याचप्रकारे संसदेत देखील चर्चेला कुठेतरी अडथळे आणले जात आहेत का ? असा प्रश्न पडतो. असो कितीही अडथळे आणले तरी दोषींना कोणीही वाचवू शकणार नाही हे मात्र नक्की, असेही रोहित पवार म्हणाले.