
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देशात अमृतकाळ सुरू नसून संकटाचा काळ असल्याचे विधान केले आहे. तसेच देशाचे संविधान धोक्यात असून संस्था कमकूवत केल्या जात असल्याचा आरोप देखील केला आहे. आपला पक्ष या विषयावर तळागाळात जनजागृती करेल असे देखील त्यांनी सांगितले आहे.
समाजवादी पक्षाच्यावतीने शुक्रवारी लखनौ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना अखिलेश यादव यांनी १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पक्षाच्या वतीने ग्रामस्तरावर साजरी करण्यात येईल. या कार्यक्रमात ‘संविधानासमोरील संकट’ याविषयावर चर्चा करण्यात येईल, अशी माहिती दिली. पीटीआयने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

























































