
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हाप्रमुख – मुकेश मुरुमकार (आकोट व मूर्तिजापूर), उपजिल्हाप्रमुख – शंकर आप्पा लंगोटे (अकोला पूर्व विधानसभा शहर विभाग), तालुकाप्रमुख – अवी गावंडे (आकोट तालुका), सौरभ वाघोडे (तेल्हारा तालुका), शहर संघटक – अनिल परचुरे (अकोला पश्चिम), तालुकाप्रमुख – संजय भांबेरे (अकोला पश्चिम), ज्ञानेश्वर गावंडे (अकोला पूर्व).
























































