
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या निमकर्दा येथे देवानंद सुखदेव इंगळे या शेतकऱ्याने डोक्यावर साठलेले 20 हजार रुपये कर्ज फेडता येणार नाही या चिंतेतून आज आपल्याच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अतिवृष्टी व कर्जमुक्ती होत नसल्याच्या चिंतेमुळेच इंगळे यांनी आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. इंगळे हे अल्पभूधारक शेतकरी होते. सेवा सहकारी सोसायटीमधून त्यांनी गावच्या तलाठय़ाला पत्र पाठवून इंगळे यांच्या डोक्यावर किती कर्ज होते याचा आकडा सांगितला आहे. 2022 चे पीककर्ज रुपये 15 हजार आणि त्यावरील 5400 रुपये व्याज असा 20 हजार 450 रुपयांचा बोजा इंगळे यांच्या डोक्यावर होता, असे सोसायटीने त्या पत्रात नमूद केले आहे.