अक्षयच्या ‘केसरी-2’ वर संवाद चोरीचा आरोप

अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘केसरी-2’ हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटाच्या लेखक आणि निर्मात्यांवर संवाद चोरीचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप यूट्यूबर आणि कवी याह्या बुटवाला यांनी केला. जालियनवाला बागवरील त्याची कविता चित्रपटात शब्दशः कॉपी करण्यात आली आहे. त्याचे श्रेयही देण्यात आलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. याह्या बुटवालाने त्याच्या पोस्टमध्ये अक्षय कुमार, करण जोहर, अनन्या पांडे, सुमित सक्सेना आणि धर्मा प्रॉडक्शन्सना टॅग केले.