न्या. वर्मा यांच्यावर महाभियोग आणणार

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर पावसाळी अधिवेशनात महाभियोग आणणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली आहे. वर्मा यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावावर आतापर्यंत 100 खासदारांनी सह्या केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मार्च 2025 मध्ये वर्मा यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आग लागली होती. यावेळी त्यांच्या घरातून अर्धवट जळालेल्या अवस्थेत नोटांची बंडले आढळली. त्यावरून देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणाच्या तपासानंतर न्या. वर्मा यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली.