अभिनेत्याच्या सुटकेची मागणी करत अल्लू अर्जुनच्या चाहत्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्याला चंचलगुडा कारागृहात रात्रभर ठेवण्यात आले होते. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या सुटकेची मागणी करत अल्लू अर्जुनच्या एका चाहत्याने कारागृहाबाहेर जीवन संपवण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला. चाहत्याने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतले.

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या बातमीनुसार, एका तेलुगु सबस्क्राईबरने हा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर पोलिसांनी किंवा अल्लू अर्जुनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.