
अभिनेता अल्लू अर्जुनचा आगामी ‘राका’ चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजीसह 9 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी अल्लू अर्जुनने 175 कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. तसेच चित्रपटाच्या नफ्यात 15 टक्के वाटादेखील असणार आहे. दिग्दर्शक अॅटलीला चित्रपटासाठी 100 कोटी दिले आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुन 4 वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘राका’ चित्रपटाचे एकूण बजेट 800 कोटी रुपये आहे.




























































