
अमरनाथ यात्रा मार्गावर भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला मंगळवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले आहेत. जखमांना उपचारासाठी रामबन येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील केला मोर बोगदा-टी2 येथे दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रामबनचे तहसिलदार दीप कुमार यांनी अपघाताची पुष्टी करत जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन दिले. जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचे रामबन जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुदर्शन कटोच यांनी सांगितले.