बम बम भोले… अमरनाथ यात्रेकरूंची चौथी तुकडी पोहोचली, तीन दिवसांत 48 हजार भाविकांनी घेतले दर्शन

पवित्र अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू झाली. पहिल्या तीन 48 हजार भाविकांनी बाबा बर्फानी यांचे दर्शन घेतले. अशातच यात्रेकरूंची चौथी तुकडी गंदरबलमधील बालटाल आणि अनंतनागमधील पहलगाममधील नुनवान बेस कॅम्पमध्ये पोहोचली आहे. भाविकांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष केला.

अमरनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी 21,109 भाविकांनी बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पवित्र गुहेला भेट दिली. यामध्ये 16,159 पुरुष आणि 3,921 महिलांचा समावेश होता. 226 मुले, 250 साधू, 29 साध्वी, 521 सुरक्षा कर्मचारी आणि 3 ट्रान्सजेंडर भक्तदेखील दर्शनासाठी आले होते. अमरनाथ यात्रा मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. लष्करासोबतच सीआरपीएफ जवानही तैनात करण्यात आले आहेत. यात्रा मार्गावर अनेक लंगर चालवले जात आहेत.