दोन लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 11 दिवसांत तब्बल 2 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुफेतील बर्फाच्या शिवलिंगाचे  दर्शन घेतले. रविवारी 20 हजार भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. सोमवारी 6100 भाविकांची एक तुकडी जम्मू कश्मीरच्या गांदरबल येथील बालटाल आणि पहलगामच्या नुनवान बेस कॅम्पसाठी रवाना झाला. अमरनाथ यात्रेदरम्यान अपघातांची मालिका सुरूच आहे. गांदरबल जिह्यातील जेड मोड बोगद्याजवळ भाविकांचे गाडी पलटून  सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले.