
अमेरिकन सरकारने ‘एच-1 बी’ व्हिसाधारकांना मोठा दिलासा दिला आहे. एक लाख डॉलर्सचे वाढीव शुल्क या व्हिसाच्या नूतनीकरणासाठी लागणार नाही, असे ट्रम्प सरकारने स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या सिटिझनशिप अॅण्ड इमिग्रेशन सेवा विभागाने यासंदर्भात निवेदन काढले आहे. त्यानुसार ‘एफ-1’ व्हिसाधारक विद्यार्थ्यांना व ‘एल-1’ व्हिसाधारक प्रोफेशनल्सनाही त्यांच्या व्हिसाचे स्टेटस बदलण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
दहशतवाद्यांचापाकिस्तानी सैन्यावर हल्ला
इस्लामाबाद : पाकिस्तानने पोसलेला दहशतवादाचा भस्मासुर त्यांच्यावरच उलटला आहे. सलग दुसऱया दिवशी दहशतवाद्यांनी पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकचे 10 सैनिक ठार झाले आहेत, तर अनेक जखमी झाले आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी आज बलुचिस्तानात तैनात पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला. त्यात पाकचे पाच सैनिक ठार झाले, तर दोन जखमी झाले.
राज्यपालांचे नवे प्रबंधक निशिकांत देशपांडे
मुंबई : निशिकांत देशपांडे यांची राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे परिवार प्रबंधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निशिकांत देशपांडे यांनी यापूर्वी जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पर्यटन आणि क्रीडा अशा विविध खात्यांमध्ये मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी दिली आहे.