
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. या युद्धामुळे उद्भवणाऱ्या ऊर्जा टंचाईचा धोका आणि परदेशात अडकलेल्या तमिळ नागरिकांच्या सुरक्षेबाबत त्यांनी तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे.
एम. के. स्टालिन यांनी X वर एक पोस्ट करत लिहिले आहे की, पश्चिम आशियातील तणावामुळे तामिळनाडूतील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी असलेला एलपीजी (LPG) पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी केंद्राने तात्काळ खबरदारी घ्यावी.
एम. के. स्टालिन यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनाही पत्र लिहिले आहे. आगामी उन्हाळ्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता, नॅचरल गॅस (सप्लाय रेग्युलेशन) ऑर्डर, २०२६ च्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करावा, जेणेकरून राज्यातील वीज प्रकल्पांना पुरेसा वायू पुरवठा उपलब्ध होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे पत्र तामिळनाडूचे खासदार वैयक्तिकरित्या केंद्रीय मंत्र्यांना सुपूर्द करणार आहेत.
In view of the ongoing #WestAsiaWar, I have written to Hon’ble @PMOIndia on urgent issues affecting Tamil Nadu and our people abroad.
⛽ LPG supply disruption: Urged immediate steps to ensure uninterrupted LPG supply for domestic, commercial, and industrial consumers in Tamil… pic.twitter.com/aFbw0oqvGR
— M.K.Stalin – தமிழ்நாட்டை தலைகுனிய விடமாட்டேன் (@mkstalin) March 11, 2026

























































