
लडाख संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी लडाखमधील पाच नवीन जिल्ह्यांची घोषणा केली आहे. त्याबाबत त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरुन माहिती दिली आहे.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवरुन लडाखमधील पाच नवीन जिल्ह्यांची घोषणा केली आहे, झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी नवीन जिल्ह्यांची नावे असून आता लडाखमध्ये पाच जिल्हे असणार आहेत. लडाख प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार आतापर्यंत लेह आणि कारगील हे दोन जिल्हेच आहेत. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमध्ये एकूण सात जिल्हे असतील.याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.