कृषी मंत्र्यांनी चाकणकरांची वकिली सोडून ‘अवकाळी’वर लक्ष केंद्रित करावे, संतप्त शेतकऱ्याचा दत्तात्रय भरणे यांना फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पावसामुळे बेजार झालेल्या एका शेतकऱयाने थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पह्न करून  रुपाली चाकणकर यांची वकिली करण्यापेक्षा राज्यातील शेतकऱयांवर लक्ष पेंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व नाना पटोले यांनीही या प्रकरणी भरणेंवर टीका करत संताप व्यक्त केला आहे.

पुण्यातील दत्ता पवार नामक शेतकऱयाने शुक्रवारी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पह्न केला. हा पह्न उचलणाऱया भरणे यांच्या पीएने त्या शेतकऱयाला थोडय़ा वेळाने पह्न करण्याची विनंती केली. त्यावर त्या शेतकऱयाने कृषी मंत्र्यांना चाकणकरांची वकिली सोडून राज्यात अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे लक्ष पेंद्रित करण्याचा निरोप पोहचवा, असा संताप व्यक्त केला. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचा दाखला देत सरकारवर कॉँग्रेस नेत्यांनी कृषी मंत्री भरणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

जबाबदारीची आठवण करावी लागते हे दुर्दैवी -वडेट्टीवार

एकीकडे राज्यातील शेतकऱयांवर अवकाळी पावसाचे अस्मानी संकट कोसळले आहे. या परिस्थितीत कृषी मंत्र्यांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देणे, शेतकऱयांना मदत देणे गरजेचे होते. मात्र अशा वेळी शेतकऱयांना कृषी मंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून द्यावी लागत आहे हे दुर्दैवी आहे, असा टोला कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

जनतेच्या मनात सरकारची प्रतिमा खालावली – पटोले

शेतकऱयांना सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा असताना राज्याचे कृषी मंत्री हे शेतकऱयांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी भोंदूबाबा ‘पॅप्टन खरात’ प्रकरणात नाव समोर आलेल्या लोकांना क्लीन चिट देण्यात व्यस्त आहेत. कृषी मंत्र्यांना राज्यातील शेतकऱयांचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का, असा सवाल कॉँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.