विलीनीकरणाबाबत किती बैठाका झाल्या, हे सगळं दुखवटा संपल्यानंतर सांगणार – अनिल देशमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामतीत विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. यानंतर राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्ची राजकारणात सुरू आहेत. यावर दोन्ही राष्ट्रवादीकडून अनेक दावे- प्रतिदावे केले जात असताना यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही  यावर प्रतिक्रिया दिली आहे. विलीनीकरणाबाबत दुखवटा झाल्यावर सविस्तर बोलू, असं अनिल देशमुख यांनी सांगितले.

अनिल देशमुख यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे सध्या दुखवट्याचा काळ सुरू आहे. हा दुखवट्याचा काळ संपल्यानंतर आम्ही विलीनीकरणाच्या बाबतीत काय काय घडलं? काय घडले नाही, कुठे मीटिंग झाल्या? यामध्ये कोण कोण होतं? कोणत्या तारखेला मीटिंग झाल्या? कोणत्या वेळेला झाल्या? हे सगळ सविस्तरपणे बोलू, असे अनिल देशमुख म्हणाले.

अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला की तो घातपात होता असा संशय व्यक्त होऊ लागला आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, विमानाचा अपघात हा दाट धुक्यामुळे धावपट्टी न दिसल्यामुळे झाला असे बोलले जात आहे. मात्र अपघाताचा व्हायरल झालेला व्हिडीओ एवढ्या लांबून शूट झाला असून त्यात सगळं स्पष्ट दिसतंय. कशाप्रकारे विमान आले आणि लॅण्डींगदरम्यान त्याचा कसा अपघात झाला हे त्यात स्पष्ट दिसतय. त्यामुळे अनेकांना याबाबत शंका आहे. पण आता ब्लॅकबॉक्स सापडला असून त्याचा तपास केला जाईल आणि यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. असे ते यावेळी म्हणाले.