आयफोनवरचा विश्वास कायम! तक्रारीनंतरही 74 टक्के यूजर्संकडून अपडेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयओएस 26 अपडेट केल्यानंतर बॅटरी लवकर संपणे, परफॉर्म्स कमी होणे, लिक्विड ग्लास इंटरफेससारख्या तक्रारी आल्या होत्या. यामुळे अॅपलच्या या नव्या अपडेटला कमी रिस्पॉन्स मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, चार वर्षात लाँच झालेले 74 टक्के आयफोन हे आयओएस 26 वर काम करत आहेत. याचाच अर्थ आयफोन युजर्संनी आयफोन आणि त्याच्या अपडेटवर अजूनही विश्वास कायम ठेवत हे अपडेट केल्याचे दिसत आहे. अॅपलने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार वर्षात लाँच केलेले 74 टक्के आयफोन आयओएस 26 वर सुरू आहेत. 20 टक्के यूजर अजूनही आयओएस 18 वर चालतात तर 6 टक्के आयफोन जुन्या व्हर्जनवर चालतात. सर्व आयफोनची आकडेवारी पाहिली तर 66 टक्के फोन हे आयओएसवर अपडेट झाले आहेत. 24 टक्के आयओएस 18 वर तर 10 टक्के फोन जुन्या सिस्टमवर चालू आहेत. आयओएस 26 सोबत अनेक युजर्संनी बॅटरी लवकर संपणे, फोन स्लो होणे आणि लिक्विड क्लास डिझाईनच्या रीडेबिलिटीवरून तक्रारी आल्या होत्या. अॅपलने आयपॅड ओएस 26 चे आकडेवारीसुद्धा जारी केली आहे. मागील चार वर्षात लाँच झालेले 66 टक्के आयपॅड्स आता आयपॅड ओएस 26 वर काम करत आहेत. तर सर्व आयपॅड्समध्ये हा आकडा 57 टक्के आहे.