बिहारमधील अररिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाला परिसरातील गुंडानी चोरीच्या संशयावरून अशी शिक्षा दिली आहे की पुन्हा कोणी चोरी करण्याची हिंमत करणार नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रीय जनता दलाने बिहार सरकारवर हल्लाबोल केला आहे. बिहारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. राज्यात गुंडगिरीची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप आरजेडीने केला आहे.
नेमकं काय घडल?
बिहारमधील एका तरुणाला चोरी केल्याच्या आरोपाखाली बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्या तरुणाचे दोन्ही हात बांधले. एकाने त्याला घट्ट पकडून त्याची पँट काढली. तरुण घाबरला आणि पुढे वाकला, त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिरची टाकण्यात आली. हा तरुण रडत होता, आरडाओरड करत होता. मात्र घटनास्थळी उपस्थितांनी जबरदस्तीने पेनच्या सहाय्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिरची भरली. तरुणाचे हात बांधलेले असल्यामुळे तो काहीच करू शकला नाही.
यानंतर लोकांनी त्याला पुन्हा पँट घालून तिथेच ठेवलेल्या टेबलवर बसवले. तेथे उपस्थित लोकांनी तरुणाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. यावेळी घटनास्थळी सुमारे 10-12 लोक उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान लोकांनी या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.
यह है नीतीश भाजपा का महागुंडाराज-महाजंगलराज! यह तालिबान से भी बदतर है। CM को होश-ओ-हवास नहीं है। प्रतिदिन बिहार में सैंकड़ों मर्डर हो रहे है। pic.twitter.com/LUpAMZR8Zw
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) August 27, 2024
RJD चा सरकारवर निशाणा
या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाने बिहार सरकारवर निशाणा साधला. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘महागुंडराज-महाजंगलराज! हे तालिबानपेक्षा वाईट आहे. मुख्यमंत्र्यांना अक्कल नाही. बिहारमध्ये दररोज शेकडो हत्या होत आहेत, असा हल्ला आरजेडीने केला आहे.