हिवाळ्यात कोंड्याची समस्या सतावतेय? हा घरगुती उपाय करेल मदत

हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा, केस तुटणे, डोक्यात कोंडा होणे अशा कितीतरी गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागत असतो. आता या वातावरणामध्ये नेमके काय केले तर केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत होईल, अशावेळी थंडीत आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊया.

केसातील कोंड्याने त्रस्त असाल तर केस धुण्यापूर्वी केसांना राईच्या तेलात लिंबाचा रस एकत्र करुन केसांच्या मुळाला लावा. राईचे तेल थोडं कोमट करुन एका वाटीत घ्या. त्यात जास्त प्रमाणात लिंबाचा रस घ्या. त्यानंतर कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ते केसांच्या मुळांना लावावे. किमान 45 मिनीटे ते तेल तसेच केसात ठेवावे. त्यानंतर काही वेळाने केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे.

केसांना राईचे तेल आणि लिंबू लावण्याचे अनेक फायदे आहे. राईचे तेल हे अॅण्टीबॅक्टेरीअल आहे ज्याने केसातील कोंडा कमी होतो आणि कोरडेपणा कमी होतो. तर लिंबाचा रस अॅण्टीबॅक्टेरिअल अॅण्टी डॅण्ड्रफ होण्याबरोबरच अॅण्टी इंफ्लेमेटरीही आहे. या दोन्हीमुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत मिळते.