हे करून पहा – थकल्यासारखं वाटतंय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरेशी विश्रांती घेऊनही हा थकवा कमी न झाल्यास काही घरगुती उपाय निश्चितच फायद्याचे ठरतात.

खूप थकल्यासारखे वाटल्यास एक कप आल्याचा चहा प्यायल्यास फ्रेश वाटू शकते. आल्यामुळे शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते आणि हॉर्मोन्सचे असंतुलन दूर होते.

थकवा दूर होण्यासाठी रोज कोमट पाण्यामध्ये आवळा पावडर घेतल्यास त्याचा निश्चित फायदा होतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात असते. यातील एड्रेनल ग्लँडमुळे ताण दूर करणारे हॉर्मोन्स स्रवण्यास मदत होते.

कच्चा लसूण खाल्ल्यास जास्त चांगले. लसूणमध्ये बरेच औषधी गुण असतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.