प्रबोधन कुर्ला शाळेची आधुनिक वाटचाल, शिवसेनेतर्फे ‘डिजिटल बोर्ड’ भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार व तंत्रज्ञानावर आधारित उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शिवसेनेतर्फे प्रबोधन कुर्ला पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेला दोन अत्याधुनिक ‘इंटरऑक्टिव्ह बोर्ड’ भेट देण्यात आले. या ‘डिजिटल बोर्ड’मुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानस्नेही शिक्षण घेणे अधिक सुलभ होणार आहे.

शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांच्या संकल्पनेतून हे ‘डिजिटल बोर्ड’ शाळेला भेट देण्यात आले. या बोर्डच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान अनिल परब यांनी शाळेच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीचे काwतुक करत गरीब वस्तीतील मुलांनाही उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर राहील, अशी भावना व्यक्त केली. या वेळी सुप्रसिद्ध उद्योजक हितेश रोहरा, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊ कोरगावकर, विश्वस्त शलाका कोरगावकर, मुख्याध्यापिका विशाखा परब, मुख्याध्यापक संतोष चिकणे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.