टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात आणखी सातजण पोलिसांच्या जाळ्यात, अमृतसरहून मुंबईत पाठवली शस्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करण्यासाठी अमृतसरहून पिस्तूल व काडतुसे आणून ती दोघा महिलांच्या माध्यमातून मुंबईत आरोपींना देणाऱया चौघांसह या आरोपींना साथ देणाऱया आणखी तिघांना मुंबई गुन्हे शाखेने उचलले आहे. लवकरच त्या सात जणांना मुंबईत आणून त्यांची चौकशी केली जाईल. दरम्यान, या घटनेत छातीत गोळी लागून जखमी झालेल्या उमेश चौहान या ब्लॉगरच्या शरीरातून गोळी बाहेर काढण्यात केईएम रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे.

रविवारी टायगरवर जुहू येथे गोळीबार झाला होता. त्या हल्ल्यात तो सुखरूप बचावला. तीन आरोपी गोळीबार करून मुंबईबाहेर सटकले, पण गुन्हे शाखेने 15 तासांत त्यांचा शोध घेऊन फुल सिंग, रेहान आणि ऋतिक अशा तिघांना पकडले. त्यांना आज मुंबईत आणून किल्ला कोर्टात हजर केले असता त्यांची 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या तिघांव्यतिरिक्त या गुह्यात सक्रिय सहभागी असलेल्या आणखी सात जणांनादेखील पोलिसांनी पकडले आहे. त्या सर्वांची ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना मुंबईत आणण्यात येत आहे. कुणाल (21), सुमित (19), राधा वर्मा (29), बबिता राव (24) आणि अंकित (18) अशी अटक केलेल्या अन्य पाच जणांची नावे आहेत. तसेच समीर आणि जतिन या दोघांनाही पकडण्यात आले आहे.

सोनीपतचे राहणारे असलेले कुणाल आणि सुमित या दोघांनी अमृतसरहून पिस्तूल व काडतुसे आणली होती. मग यूपीच्या राहणाऱया असलेल्या राधा व बबिता या दोघी रेल्वेने ती शस्त्रs मुंबईत घेऊन आल्या आणि ते आरोपींना त्यांनी दिले. शिवाय सोनीपतचाच असलेला जतिन (18) हादेखील शस्त्र आणण्यासाठी अमृतसरला गेला होता. त्याचबरोबर समीर हादेखील आरोपींसोबत होता. त्यामुळे या सर्वांना पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मz अंकित हा 20 दिवस मुंबईमध्ये राहिला होता. यानेच आरोपींना लॉजिस्टिक सपोर्ट दिला होता हे समोर आले आहे. तसेच समीर हादेखील आरोपींसोबत रेकी वगैरे करायला होता.

– राधा ही कुणालची प्रेयसी असून ती बबिताची मैत्रीण आहे. बारावी शिकलेली बबिता वायर फिटरचे काम करते, तर राधा काहीच करत नाही. कुणाल (दहावी), सुमित (आठवी) बबिता व अंकित बारावीपर्यंत शिकलेले आहेत.

– आरोपींना वेगवेगळय़ा मार्गाने पैशांचा पुरवठा करण्यात आला होता. पण किती रक्कम आरोपींना देण्यात आली ते मात्र समजू शकले नाही.