
जानेवारी महिन्याच्या उच्च्यांकानंतर आता सोने चांदीत मोठी घसरण होत आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेतील मध्यावधी निवडणूका, वाढलेले बॉन्ड इन्ड, जागतिक अस्थिरता या सर्वांचा परिणाम सोने चांदीच्या किमतीवर होत आहे. त्यामुळे उच्च्यांकापेक्षा सोने चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वायदे व्यवहार सुरू होताच, दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात मोठी घसरण झाली. चांदीच्या दरात ₹5,000 पेक्षा जास्त घसरण होऊन तो ₹2.03 लाख प्रति किलोवर पोहोचला. सोन्याच्या वायद्यांमध्येही २००० रुपयांची मोठी घसरण होऊन ते ₹1.44 लाख प्रति 10 ग्रॅमवर आले.
गेल्या चार दिवसांपासून चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असली तरी, गुरुवारी या घसरणीला अधिक वेग आला. एमसीएक्सवर व्यवहाराच्या सुरुवातीला, 4 डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या चांदीचा 1 किलोचा भाव आदल्या दिवसाच्या ₹2,09,168 च्या बंद भावाच्या तुलनेत घसरून ₹2,03,798 वर आला. त्यामुळे चांदी एकाच झटक्यात ₹5,370 प्रति किलोने स्वस्त झाली.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, एमसीएक्स (MCX) चांदीच्या दराने सर्व विक्रम मोडून प्रथमच ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आणि ४,२०,०४८ रुपयांचा उच्चांक गाठला. सध्याच्या किमतीनुसार, चांदी आता या उच्चांकापेक्षा २,१६,२५० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
केवळ चांदीच नाही, तर सोन्याच्या वायदे दरातही मोठी घसरण झाली आहे. ४ डिसेंबर रोजी मुदत संपणाऱ्या १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा MCX वरील भाव गुरुवारी बाजार उघडताच ₹१,४४,३११ पर्यंत घसरला. बुधवारी सकाळी, मौल्यवान पिवळ्या धातूचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४६,०७९ वर बंद झाला होता. परिणामी, सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ₹१,७६८ ची घसरण झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.



























































